breaking-newsपुणे

ससून रुग्णालयात दंत चिकित्सा विभागाचे उद्घाटन

पुणे- ससून सर्वोपचार रुग्णालयाला दानशूर व्यक्‍तींकडून अर्थसहाय मिळत आहे. त्यातून ससून रुग्णालयातील उपचार अत्याधुनिक होत आहेत. सर्वसामान्यांना परवडतील अशा अनेक शस्त्रक्रिया येथे होऊ लागल्या आहेत. त्यामुळे ‘ससून फॉर कॉमन मॅन’ ही संकल्पना प्रत्यक्षात येत असून, सामान्यांसाठी ससून रुग्णालय आधार बनत आहे,” असे प्रतिपादन ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी केले.
फिनोलेक्‍स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशनतर्फे मुंबईतील प्रसिद्ध वकील दीपा व जनक द्वारकादास यांनी दिलेल्या 10 लाख रुपयांच्या देणगीतून ससून रुग्णालयात आधुनिक लेसर मशीनद्वारे दांतरोपण सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या अत्याधुनिक दंतचिकित्सा विभागाच्या उद्घाटनावेळी डॉ. चंदनवाले बोलत होते. प्रसंगी दीपा द्वारकादास, ऍड. जनक द्वारकादास, दंत चिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. विवेक पाखमोडे, मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू छाब्रिया, गायत्री छाब्रिया, मनीषा जेठा, मनीष जेठा, डॉ. समीर खैरे, डॉ. प्रणव पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button