Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
सरकारी कार्यालयांना रक्षाबंधनाच्या दिवशी सुट्टी जाहीर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/97607-rakshabandhanreuters.jpg)
पुण्यात राज्य सरकारी कार्यालयांना तीन ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी सुटी जाहीर करण्यात आली आहे. रक्षाबंधनासह अनंत चतुर्दशी आणि घटस्थापना या दिवशीही सरकारी कार्यालये बंद राहणार आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर सुमारे ३० ते ३५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सरकारी कार्यालयांचे कामकाज सुरू आहे. काही सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कार्यालयीन कामकाज सांभाळत त्यांच्याकडून अतिरिक्त काम सांभाळण्यात येत आहे.
विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी जिल्ह्यातील राज्य सरकारी कार्यालयांना तीन ऑगस्ट रोजी रक्षाबंधनानिमित्त सुट्टी जाहीर केली आहे. याशिवाय एक सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आणि १८ ऑक्टोबरला घटस्थापनेला राज्य सरकारी कार्यालयांना सुट्टी असणार आहे.