समलैंगिक संबधांना विरोध केल्याने पुण्यात तरुणावर कोयत्याने वार
पुणे – पुण्यातील टिळक रस्त्यावर हॉटेल गिरिजाजवळ एका तरुणावर अनोळखी व्यक्तीने कोयत्यानेने वार केल्याची घटना आज (ता.21) दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या हल्यात जखमी झालेल्या तरुणास ससुन रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
समलैंगिक संबंधास विरोध केल्याच्या कारणावरुन तिघांनी या तरुणावर कोयत्याने वार केले आहेत. नागरीकांनी तिन्ही आरोपीस पकडुन पोलिसांकडे दिले. त्यापैकी एकजण अल्पवयीन आहे. दिनेश उर्फ गन्या सुरेश कांबळे (वय 24) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, मयूर मोतीराम राठोड (वय 18, रा.कामराज नगर येरवडा), महेश धनेश तिवारी (वय 18, रा. येरवडा) असे हल्ला केलेल्या आरोपी तरुणांची नावे आहेत. या दोघांसह आणखी एका अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी, खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिस पुढील कारवाई करत आहेत. हल्ला झालेल्या तरुणाची मात्र अद्याप ओळख पटलेली नसल्याचे सांगण्यात आले आहे.