breaking-newsपुणे
सभासद नसलेल्या विद्यार्थ्यांना ‘रिफेक्टरी’चे जेवण बंद; विद्यार्थी आक्रमक
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या “रिफेक्टरी’ (भोजनालय) येथे सभासद नसलेल्या विद्यार्थ्यांनाच जेवणाची सुविधा आजपासून बंद केली. त्याच्या विरोधात विद्यार्थ्यांनी आज रिफेक्टरीसमोर आंदोलन करीत आक्रमक पवित्रा घेतला. रिफेटक्रीचे नवीन नियम विद्यार्थ्यांवर अन्यायकारक करणार आहेत. हे सर्व नवे नियम रद्द करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली.
दरम्यान, सोमवारी दुपारी बारा वाजता रिफेक्टरीच्या समोर 100 हून अधिक विद्यार्थी होते. त्यांनी घोषणाबाजी केल्यानंतर विद्यापीठाच्या सुरक्षारक्षक घटनास्थळी दाखल झाले. रिफेक्टरीच्या नवीन नियमावली रद्द करण्याचे निवेदन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांना दिले.