breaking-newsताज्या घडामोडीपुणे

संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांना पुण्यात जिल्हाबंदी

पुणे | ‘शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान’चे संभाजी भिडे आणि ‘हिंदू एकता आघाडी’चे मिलिंद एकबोटे यांना पुण्यात चार दिवसांची जिल्हाबंदी करण्यात येणार आहे. कोरेगाव भीमामध्ये एक जानेवारीला होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन समारंभाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या दिवशी सर्व राजकीय आणि सामाजिक संघटनांना कोरेगाव भीमामध्ये सभा घेण्यास परवानगी देण्याचे ठरवण्यात आले आहे.

एकबोटे आणि भिंडेंसह एकूण 163 आरोपींना जिल्हाबंदी करण्यात आली आहे. कोरेगाव भीमामध्ये उसळलेल्या हिंसाचाराप्रकरणी 2018 मध्ये ज्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते, त्या सर्वांना जिल्हाबंदी करण्यात आली आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलिसांनी यासंबंधीचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात या कार्यक्रमाच्या तयारीच्या निमित्ताने काल बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत भिडे आणि एकबोटे यांना जिल्हाबंदी करण्याचा निर्णय झाल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button