Breaking-newsपुणे
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरातील दानपेटी चोरली
पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिराचा दरवाजा तोडून दानपेटी चोरल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरात अनेक वर्षापासून स्टीलची दोन फूटी दानपेटी ठेवलेली होती.
ही दानपेटी मंगळवारी पहाटेच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या, दोन चोरट्यांनी पळवल्याची घटना समोर आली आहे. मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये ही घटना कैद झाली आहे. या दानपेटीमध्ये भाविकांच्या देणगीतून जमा झालेली साधारण वर्षभराची रक्कम होती. एकूण किती लाखांची चोरी झाली आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नसून या घटनेचा तपास विश्रामबाग पोलीस करीत आहे.