शेतक-यांच्या विविध मागण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/IMG-20191115-WA0022.jpg)
पुणे |महाईन्यूज|प्रतिनिधी|
मराठा सेवा संघ – संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज (शुक्रवार) शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा. अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये मदत त्वरीत मिळावी. पिक कर्ज संपूर्ण माफ करावे.विज बिले माफ करावीत. विमा नुकसान भरपाई तातडीने शेतकऱ्यांचा खात्यांवर जमा करण्याचे आदेश द्यावेत या मागणीसाठी आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले करुन पुणे जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांना या बाबतचे निवेदन देण्यात आले.
हे आंदोलन शांताराम बापू कुंजीर यांच्या नेतृत्वाखाली पार पडले या वेळी पुणे जिल्हा अध्यक्ष विशाल तुळवे.कार्याध्यक्ष प्रमोद गोतारने.उपाध्यक्ष सतिश काळे.नानासाहेब निवडुंगे. शहराध्यक्ष हर्षवर्धन मगदुम.जगजिवन काळे.ज्ञानेश्वर लोभे. प्रदिप कनसे.संग्राम देशमुख.रशीदभाई सय्यद.प्राचीताई दुधाने.छायाताई खैरनार.प्रशांत धुमाळ यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते