breaking-newsताज्या घडामोडीपुणे

शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर; राजा मात्र बॉलिवूडसाठी चिंतातुर’,- भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे

पुणे: प्रशासनाने केलेले चुकीचे पंचनामे आणि त्यामुळे शेतकरी वर्गाला मोठी झळ सोसावी लागत आहे या प्रशासनाचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याच्या वतीने पोटोबा मंदिर, वडगाव येथून मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी मा.मंत्री बाळाभाऊ भेगडे ,जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी या मोर्चाचे नेतृत्व करून सर्व सामान्य जनतेच्या हक्कासाठी आसूड मोर्चाच्या माध्यमातून प्रशासनाच्या विरोधात आवाज उठविलेला आहे.

3 जून 2020 रोजी झालेल्या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करताना तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक झाली असल्याचा आरोप करून त्या निषेधार्थ तहसील कार्यालयासमोर आंदोलन केलेले आहे. निसर्ग वादळामुळे मावळ तालुक्यातील झालेल्या शेतकरी व नागरिकांच्या मोठ्या प्रमाणातील नुकसान त्याचे प्रशासनाने केलेले चुकीचे पंचनामे त्यामुळे शासनाने दिलेल्या नुकसान भरपाई मध्ये अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून भरपाई मिळालेली नाहीये.

ज्यांना मिळाली ती सुद्धा एकदम तोकडी असून त्याच्याविरोधात मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झालेला आहे, आज गावागावातून अनेक वंचित शेतकऱ्यांनी आसूड मोर्चात सहभाग घेऊन प्रशासनाच्या विरोधात हाक दिलेली आहे. यामध्ये आसूड मोर्चाला तहसिलदार मधुसूदन बर्गे यांनी हजेरी लावून समस्त आंदोलकांना आश्वस्त केले फसवे पंचनामे करून खऱ्या नुकसानग्रस्तना लाभापासून वंचित ठेवरण्यावर कारवाई करून सर्व नुकसानझालेल्या शेतकरी व नागरिकांना न्याय देऊ त्यानी सागितलेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button