breaking-newsताज्या घडामोडीपुणे

शिष्यवृत्ती नाकारल्याचा खुलासा करा

पुणे जिल्ह्यातील २६० महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस

पिंपरी । प्रतिनिधी

सामाजिक न्याय विभागाकडून दिली जाणारी शिष्यवृत्ती नाकारल्याप्रकरणी पुणे जिल्ह्यातील २६० महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. याप्रकरणी पाच दिवसांत खुलासा करण्याचा आदेश सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्त संगीता डावखरे यांनी दिला आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या वतीने सामाजिक न्याय विभागाकडून महाविद्यालयीन, व्यावसायिक, अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना महाविद्यालयांच्या माध्यमातून शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र, अनेक महाविद्यालये शिष्यवृत्ती देण्याचे जाणीवपूर्वक टाळतात.

शैक्षणिक वर्ष २०१८-१९ व या २०१९ -२० मध्ये भारत सरकारची शिष्यवृत्ती शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क या योजनेअंतर्गत महाडीबीटी अन संकेतस्थळाद्वारे मंजूर झालेली आहे. या शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होते. परंतु विद्यार्थ्यांचे बँक खाते क्रमांक चुकीचे असणे, बँक खात्यास आधारकार्ड संलग्नित करणे, बँक खाते निष्क्रिय असणे आदी त्रुटींची पूर्तता करून प्रलंबित अर्ज जलद निकाली काढा, असे सामाजिक न्याय विभागाने महाविद्यालयांना २६ नोव्हेंबर, तसेच २ डिसेंबरला पाठवूनही या २६० महाविद्यालयांनी वेळेत माहिती पुरवलेली नाही.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button