शिवसेना अन् त्यांचं नेतृत्व बावचाळलंय, सामनाच्या अग्रलेखावर अजित पवारांचा पलट’वार’
कोल्हापूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेच्या अग्रलेखाला उत्तर दिले. शिवसेना सत्तेत आहे की विरोधी पक्षात हे त्यांनाही आणि त्यांच्या नेत्यालाही गेल्या साडेचार वर्षात कळालेलं नाही. शिवसेनेची अवस्था बावचाळल्यासारखी, गोंधळल्यासारखी झाली आहे. सत्तेत असलेल्यांनी निर्णय घ्यायचे असतात. पण, शिवसेना नुसत्या मागण्या करीत आहे, अशा शब्दांत पवार यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली.
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शिवसेनेनं सामना या मुखपत्रातून जोरदार टीका केली होती. या टिकेला अजित पवार कोल्हापूरात उत्तर दिलं. महाराष्ट्र प्रदेश तसेच कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस आयोजित एल्गार परिषदेत अजित पवारांनी उद्धव ठाकरेंवर वार केला. तसेच मोदी सरकार, सीबीआय, राफेल, यांसह मोदींवरही टीका केली.
शिवसेना सत्तेत आहे की विरोधी पक्षात हे त्यांनाही आणि त्यांच्या नेत्यालाही गेल्या साडेचार वर्षात कळालेलं नाही. शिवसेनेची अवस्था बावचाळल्यासारखी, गोंधळल्यासारखी झाली आहे, असे म्हणत अजित पवार यांनी सामनाच्या अग्रलेखाला उत्तर दिलंय. तसेच सत्तेत असलेल्या शिवसेनेनं निर्णय घ्यायचे असतात. पण, शिवसेना केवळ मागण्या करत आहे, असे म्हणत अजित पवारांनी सेनेची खिल्लीही उडवली.