breaking-newsताज्या घडामोडीपुणे
शिवनेरीनंतर वढू-तुळापूरातील संभाजी महाराजाचं डाॅ. अमोल कोल्हेंनी घेतले दर्शन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/Amol-kolhe-1.jpg)
पुणे – शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी निवडणूक निकालानंतर पहिल्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरी येथे जाऊन महाराजांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेतले होते.
तसेच आज ( मंगळवारी) महाराष्ट्राचे शक्तीस्थळ असलेले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची बलिदान भूमी असलेल्या वढू-तुळापूर या ठिकाणी जाऊन महाराजांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले. यावेळी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी वढू तुळापूर येथे शंभू सृष्टी व्हावी, महाराजांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, यासाठी मी कटिबद्ध असल्याचे सांगितले.