Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
शिवजयंतीनिमित्त ‘ जय जिजाऊ, जय शिवराय ‘ वेशभूषा स्पर्धा
![Shiva Jayantinimitta 'Jai Jijau, Jai Shiv Rai' Costume Competition](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/jijau.jpg)
पुणे । प्रतिनिधी
‘सहारा ‘ प्रॉडक्शन हाऊस तर्फे शिवजयंतीनिमित ‘जय जिजाऊ, जय शिवराय ‘ ही वेशभूषा स्पर्धा १९ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. महिलांनी जिजामाता यांच्या वेशात तर लहान मुले, पुरुषांनी शिवरायांच्या वेशात स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे.एकाच कुटुंबातील स्पर्धकांना विशेष पारितोषिक दिले जाणार असल्याची माहिती ‘सहारा ‘ प्रॉडक्शन हाऊस चे संचालक डॉ. राजेंद्र भवाळकर यांनी केले आहे. नाव नोंदणीसाठी अंतिम तारीख 18 जानेवारी 2021 ही आहे. लेन नंबर 27/अ,रसिक राज बंगला.स्वानंद प्राथमिक शाळेजवळ.गणेश नगर.धायरी.पुणे येथे संध्याकाळी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत ही स्पर्धा होईल.