breaking-newsताज्या घडामोडीपुणे

शाळा – महाविद्यालय परिसरातील ७५२ पानटपरी चालकांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे |महाईन्यूज|

शहराच्या वेगवेगळ्या भागांतील शाळा व महाविद्यालयांच्या परिसरामध्ये तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्या ७५२ पानटपरी चालकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून दोन लाख ५५ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.

शाळा व महाविद्यालयांच्या परिसरामध्ये तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास कायद्याने बंदी आहे. तरीही, शहरातील काही भागांतील शाळा व महाविद्यालयांच्या परिसरामध्ये सरार्सपणे विक्री होत असल्याची सद्यःस्थिती होती. या प्रकारामुळे शालेय विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्‍यात येत असल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेच्या पथकाने मागील वर्षी पानटपरी चालकांवर कारवाईचा बडगा उगारला होता. त्यानंतर पुन्हा एकदा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ७५२ पानटपरी चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मागील चार दिवसांत ही कडक कारवाई केली. गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी या कारवाईत सहभाग घेतला होता. अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त बच्चनसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button