Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

CAB: दिल्लीही अग्नितांडव, तीन बस खाक

महाईन्यूज | दिल्ली

नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या विरोधात आसामसह ईशान्येकडील राज्यात हिंसाचाराचे उफाळलेला असून, ही आग राजधानी दिल्लीतही पोहचलेली आहे. रविवारी दुपारी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी रास्ता रोको करत तीन बस पेटवून दिलेल्या आहेत व या घटनेनंतर मथुरा रोड परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. नागरिकत्व कायदा दुरूस्तीनंतर लागू केल्यानंतर आसाम, मिझोराम, त्रिपुरा, सिक्कीमसह सात राज्यात प्रचंड तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे. हे विधेयक संसदेत मांडल्यानंतर याविरोधात रोष व्यक्त व्हायला लागलेला होता.

कायद्याची अंमलबजावणी झाल्यानंतर हिंसाचार उफाळून आलेला आहे. ठिकठिकाणी पोलिसांच्या गोळीबारात पाच जण मरण पावले असून, हिंसाचाराच्या घटना सुरूच आहेत.अनेक राज्यांकडून या कायद्याच्या अंमलबजावणीला विरोध होत असतानाच भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या आसाम गण परिषदेनं या कायद्याविरोधात भूमिका घेतलेली आहे. नागरिकत्व दुरूस्ती विधेयक राज्यसभेत मांडल्यानंतर आसाम गण परिषदेनं त्याला पाठिंबा दिला होता आता मात्र, वाढलेल्या हिंसाचारानंतर त्यांनी भूमिका बदलली आहे. “आम्ही नागरिकत्व कायदा आसाममध्ये लागू होऊ देणार नाही व आम्ही याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत,” अशी माहिती आसाम गण परिषदेचे ज्येष्ठ नेते रामेंद्रा कलिता यांनी रविवारी दिली आहे.

जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी या कायद्याविरोधात आंदोलनाची हाक दिलेली होती. रास्ता रोको करत विद्यार्थ्यांनी भारत नगर येथे दिल्ली परिवहन मंडळाच्या तीन बस पेटवून दिल्या आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button