‘व्हॅलेंटाईन डे’ ला पुण्यात निघणार ‘लव्ह परेड’, हा नेता सहभागी होणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/7-19.jpg)
पुणे |महाईन्यूज|
पुण्यात व्हॅलेंटाईन डे (valentine Day) अर्थात 14 फेब्रुवारीला अनोखी ‘लव्ह परेड’ (Love) निघणार आहे. विशेषत: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी या लव्ह परेडमध्ये सहभागी होणार आहेत. व्हॅलेंटाईन डे जगभरात सेलिब्रेट केला जातो. त्यात पुणेकरही मागे नाहीत.
व्हॅलेंटाईन डेला गुलाबाच्या फुलांची मागणी वाढते. त्यामुळे गुलाब शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना बरकत आली आहे. त्यामुळे प्रेमाचा प्रसार व्हावा यासाठी शहरात राहणारी शेतकरी मुले आणि इतर सर्वसामान्य नागरिक विशेषतः तरुण-तरुणी यांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
14 फेब्रुवारीला फर्ग्युसन कॉलेज रोडची सुरुवात जिथं होते, त्या गुडलक चौकातून कृषी महाविद्यालय म्हणजे जिथं हा रस्ता संपतो या मार्गावर ही लव्ह परेड निघणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटना सदस्य राहुल म्हस्के यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.