breaking-newsताज्या घडामोडीपुणे

विविध मागण्यासाठी बार्टी समोर विद्यार्थ्यांचे आंदोलन

वंचित बहुजन आघाडीने घेतला सहभाग  

पुणे | प्रतिनिधी

बार्टीने 6 महिन्यापासुन राज्यातील 400 विदयार्थीचे मानधन दिले नाही. त्याच्या निषेधार्थ औरंगाबाद येथील विद्यार्थ्यांचे ४ दिवसापासून पुणे बार्टी कार्यालयसमोर आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेत आपला पाठींबा दर्शविला. तसेच त्वरित या वर तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने देण्यात आला.

हे आंदोलन सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्रचे महासचिव प्रकाश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या वेळी पुणे शहरातील वंचित बहुजन युवा आघाडीचे अविनाश लहाडे, ओंकार कांबळे, तुषार गायकवाड, प्रमोद कांबळे, सम्यक विद्यार्थी आंदोलन पिंपरी चिंचवड अध्यक्ष संतोष जोगदंड, पुणे जिल्हा महासचिव कौस्तुभ ओव्हाळ यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला.

पुणे बार्टी कार्यालयासमोर स्वधार, शिष्यवृत्ती, विद्यावेतनसाठी विद्यार्थी रस्त्यावर येऊन आंदोलन करीत आहे. भर पावसातही आंदोलन चालू आहे. मात्र तरीही सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी एससी, एसटी, ओबीसी विद्यार्थी वर्गाला न्याय मिळवून दिला नाही. नवीन एमपीएससी बाबत बार्टीची जाहिरात जाहीर करावी यासाठी देशाचे भविष्य असलेला तरुण, युवक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, रस्त्यावर येऊन आंदोलन करीत आहे. त्वरित विध्यार्थ्यांच्या मागण्या सोडविण्याची मागणी वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button