breaking-newsपुणे

विद्यार्थ्याचा बसखाली येऊन मृत्यू

पुणे |महाईन्यूज|

पुण्यात अलका टॉकीजकडून स्वारगेटच्या दिशेने दुचाकीवर भरधाव निघालेल्या तरूणाचा बसखाली येवून अपघाती मृत्यू झाल्याची घटना टिळकरोडवर घडली. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या टिळक रस्त्यावरील चौकात ही घटना घडली. आकाश तुकाराम विधाते असे दुचाकीस्वाराचे नाव आकाश आहे.

आकाश हा अलका चौकातून स्वारगेटकडे चालला होता. तर बस चालक स्वारगेटहून अलका टॉकीजच्या दिशेने निघालेल्या असताना अचानक रिक्षामधे आल्याने आकाश दुचाकीसह बसच्या खाली आला. यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. आकाशने गाडी चालवताना त्याने हेल्मेट परिधान केले नसल्याचेही पोलिसांनी सांगितले. या भयानक अपघाताचा सगळा प्रकार सीसीटिव्हीत कैद झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button