विठुरायाचं दर्शन घेण्यापुर्वीच भीषण अपघात, 4 जण जागीच ठार
![4 people killed on the spot in a horrific accident before visiting Vithuraya](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/accidnetd.jpg)
पंढरपूर |महाईन्यूज|
पंंढरपूरमध्ये दर्शनासाठी जाणाऱ्या 4 भाविकांवर काळाने घाला घातला आहे. पंढरपूर-सांगोला मार्गावर खर्डीजवळ बोलोरो कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.
ही घटना इतकी भीषण होती की, यामध्ये 4 जण जागीच ठार झाले आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मृत चारही व्यक्ती कोल्हापूरमधील आहे. कोल्हापूरच्या चंदगड याठिकाणचे ते रहिवासी असून ते पंढरपूर याठिकाणी दर्शनासाठी जात असताना ही घटना घडली. मृतांमध्ये 1 पुरुष, 2 महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. या भीषण अपघातामध्ये मृतांच्या चेहऱ्याची दुर्दशा झाल्यामुळे त्यांची ओळख पटवणंही कठीण झालं होतं. मिळालेल्या आधार कार्डांच्या मदतीने त्यांची ओळख पटवली आहे. अपघाताची माहिती मिळताच पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर घटनास्थळी दाखल झालेत.
चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि घडला अपघात
कोल्हापुरातील चंदगड येथील 16 भाविक बोलेरो गाडीतून विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपूरला येत होते. पंढरपूर अवघ्या हाकेच्या अंतरावर असतानाच कासेगाव जवळच्या रस्त्यावर बोलेरो गाडीच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्याने रस्त्यावर उभे असलेल्या ट्रकला पाठी मागून जाऊन जोरदार धडक दिली. अपघात इतका जोरदार होता की, बोलेरोचा चेंदामेंदा झालाय.