वाहतूक पोलिसांनी दुचाकीस्वाराकडून वसुल केला चक्क ४२ हजारांचा दंड…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Untitled-189.png)
पुणे | महाईन्यूज |
वाहतूक नियमांचा भंग केल्यानंतर जारी झालेल्या चलनांच्या आधारे दंड न भरणाऱ्या वाहनचालकांकडून हा दंड वसुल करण्यासाठी पुणे पोलिसांनी विशेष मोहिम उघडली आहे. याच मोहिमेंतर्गत मंगळवारी पुण्यात एका दुचाकीस्वाराकडून तब्बल ४२३०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. पुणे वाहतूक पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबद्दल माहिती दिली.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/download-6.jpg)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/1582693378.jpg)
ज्या वाहनांवर सर्वाधिक दंड प्रलंबित आहे, अशा १०० वाहनचालकांची यादी १२ फेब्रुवारीपासून तयार करण्यात येत आहे. या वाहनचालकांकडे त्यांच्यावर प्रलंबित असलेला दंड तातडीने भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याच अंतर्गत मंगळवारी एका वाहनचालकाकडून ४२३०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Capture-54.png)
ज्या वाहनचालकांनी वाहतूक नियमांचा जास्तीत जास्त भंग केला आहे पण त्यावरील दंड भरलेला नाही, अशा वाहनचालकांची नावे punepolice.gov.in या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. या वाहनचालकांनी तातडीने आपल्या दंडाची रक्कम जमा करावी, असेही आवाहन पुणे पोलिसांनी केली आहे.