breaking-newsपुणे

वाहतूक नियम पाळा; चहा प्या!

  • नियम पाळणाऱ्या वाहनचालकांना चहा

वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक पोलीस तसेच येवले चहाकडून चहाच्या कुपनांचे वाटप शनिवारी करण्यात आले. आंतरराष्ट्रीय चहा दिनानिमित्त या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी चौकात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते, येवले चहाचे नवनाथ येवले, वाहतूक शाखेतील सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र सावंत, पोलीस निरीक्षक (नियोजन) जगन्नाथ कळसकर यांच्यासह वाहतूक शाखेतील अधिकारी, कर्मचारी आदी या प्रसंगी उपस्थित होते. आंतराष्ट्रीय चहा दिनानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वाहतूक नियमांचे पालन क रणाऱ्या वाहनचालकांना चहाचे कुपन वाटण्यात आली. दिवसभरात वीस हजार कुपनांचे वाटप करण्यात आले, असे येवले यांनी सांगितले.

चहाच्या कुपनावर वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन करणारा मजकूर छापण्यात आला आहे. नागरिकांनी वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने वाहने लावू नयेत. वाहतूक सुरळीत राहण्यासाठी वाहन चालकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे, असे पोलीस उपायुक्त सातपुते यांनी सांगितले.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button