वारकरी मंडळाच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी हभप दिपक महाराज खांदवे
पिंपरी | प्रतिनिधी
अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी हभप दीपक महाराज खांदवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले यांच्या हस्ते खांदवे महाराजांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
या वेळी प्रदेशाध्यक्ष हभप अनिल महाराज वाळके, माजी आमदार तथा भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, बापूसाहेब पठारे, पुणे विभागीय अध्यक्ष हभप दत्तात्रय महाराज सोळसकर, केंद्रीय सचिव हभप शंकर महाराज शेवाळे, हभप आसाराम बढे महाराज, गायनाचार्य पंडित कल्याण गायकवाड, वडगावशेरी मतदारसंघाचे भाजपचे अध्यक्ष संतोष खांदवे, ऍड. आदित्य खांदवे तसेच वारकरी मंडळाच्या कार्यकारिणीतील पदाधिकारी उपस्थित होते.
खांदवे हे सध्या भाजपा आध्यात्मिक आघाडीच्या शहराध्यक्ष या पदावर कार्यरत आहेत. कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करून आदर्श समाज घडवण्याचे मोलाचे कार्य ते गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत. लोहगाव पंचक्रोशीतील सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असतो. तसेच गेले अनेक वर्षे आषाढीवारीनिमित्त पालखी सोहळ्यात देहू ते पंढरपूर पायी जात असतात. वारकरी सांप्रदाय व आध्यात्मिक क्षेत्रातील योगदानाचा विचार करून त्यांना या महत्त्वपूर्ण पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.





