breaking-newsताज्या घडामोडीपुणे

वंचित बहुजन महिला आघाडीने पदाधिकाऱ्यांना केले… आदर्श आवाहन! वाचा!

पुणे । प्रतिनिधी

वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पक्षाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की,

“वंचित बहुजन महिला आघाडी” ही सच्च्या फुले-आंबेडकरी बौद्ध समुहासोबतच वंचितांच्या हक्कांसाठी लढणारी आदिवासी, दलित, ओबीसी, भटके- विमुक्त बहुजन समाजातील सर्व सामान्य महिला कार्यकर्त्यांची राजकिय चळवळ आहे.

आज आपल्या देशात सत्तेवर असलेल्या सरंजामी सत्ताधाऱ्यां ची एक दिखाऊ, पैशाची उधळपट्टी करणारी, वरिष्ठांची चापलुसी करणारी संस्कृती तयार झालेली आहे. वाढदिवस साजरे करणे, महागड्या भेटी देणे, मोठेमोठे जाहीर कार्यक्रम करणे, पार्ट्या करणे अभिनंदनाचे महागडे होर्डिंग्स लावणे हे या संस्कृती ने पाडलेले रिवाज आहेत. हे पोकळ दिखाऊ रिती रिवाज साध्या व गरीब कार्यकर्त्यांना परवडणारे नाहीत. ह्या महागड्या प्रथा ज्यांना परवडतात अशा मुठभर श्रीमंतांच्या ताब्यात आपली चळवळ जाऊ न देणे ही आपली जबाबदारी आहे. सरंजामी संस्कृती चे अंधानुकरण लोकहित व पक्ष हिता साठी उपयोगी नाही. आजी?माजी सत्ताधाऱ्यांची विकृत, दिखाऊ संस्कृती फुले-आंबेडकरी वंचित बहुजन चळवळीत येता कामा नये याची पदोपदी आपण काळजी घेतली पाहिजे. आपले नेते बाळासाहेब आंबेडकर सामान्य माणसांचा चेहरा म्हणून समाजापुढे आले आहेत.

त्यामुळे च पक्षनेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर त्यांच्या वाढदिवशी कटाक्षाने जाहीर कार्यक्रमात सहभागी होण्याचे टाळत आले आहेत व कार्यकर्त्यां समोर काही role model ठेवत आले आहेत.

काही विशेष कामगिरी करणारे विद्यार्थी, स्कॉलर्स, प्रदीर्घ काळ योगदान देणारे बुजुर्ग व्यक्ती यांचा सत्कार करण्यामधे आपण सद्गुण आणि समाजासाठी केलेल्या कामाचा गौरव करत असतो वाढदिवसाचे तसे नाही. तो प्रेम आदर व्यक्त करण्यासाठी आपण करतो. तेव्हा त्या मधे साधेपणा असला पाहिजे. महागड्या वस्तूरुपी भेटी देणे ही चंगळवादी संस्कृतीने वाढवलेली प्रवृत्ती आहे. अशा प्रथा गरीब कार्यकर्त्यांना ओझे ठरतात. असे कार्यक्रम घेण्यासाठी आपल्या खालच्या पदाधिकाऱ्यांवर दबाव आणणे अयोग्य आहे.

आपल्याला या ब्राह्मणी – सरंजामी राजकिय सांस्कृतीला पर्यायी अशी फुले आंबेडकरी मूल्यांचा प्रसार करणारी सामान्य, कष्टकरी माणसांची राजकिय संस्कृती निर्माण करायची आहे. त्यामुळेच शाली वगैरे देण्याच्या प्रथा आता आपण बंद करुया असे आवाहन पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्त्या नेहमीच करत असतात.

त्यासाठी महिला आघाडी साठी एक प्रस्ताव विचारार्थ ठेवत आहोत.

1) वाढदिवसाला पक्षाच्या बॅनर्स वर सत्काराचे जाहीर कार्यक्रम घेण्या ऐवजी गरजू किंवा गरीबांना मदत करण्याचा कार्यक्रम आपण घेऊ शकतो.

2) वाढदिवसाच्या अनौपचारिक कार्यक्रमातही शुभेच्छा आणि फुले या व्यतिरिक्त कोणत्याही महागड्या (शाली, साड्या, महागड्या वस्तू इ. ) भेटी देऊ नका.

3) त्याऐवजी अशा सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचा खर्च वाचवून प्रबुद्ध भारत वा पक्ष-महिला आघाडीला देणगी द्यावी व पावती घ्यावी.

4) पक्ष, आघाडीचे विविध प्रश्न व वैचारिक भूमिका यावर कार्यकर्त्यांची अभ्यास शिबिरे घ्यावीत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button