Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
लोणावळानजीक डेक्कन क्विन अन्ं लोकल ट्रेनचा अपघात टळला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/download-1-2.jpg)
लोणावळा|महाईन्यूज|
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर होणाऱ्या अपघातांची भीषणता वाढत असतानाच, आता लोणावळा रेल्वे स्टेशनच्या अलीकडे रेल्वेचाच एक मोठा अपघात होता होता टळला. रेल्वे ट्रॅकवर दोन रेल्वे समोरसमोर आल्याने एकच गोंधळ उडाला. पण चालकांच्या दक्षतेमुळे हा अपघाच वेळीच टळला.
लोणावळ्याअलीकडे पाच किमी अंतरावर हा भीषण अपघात होता होता राहिला. डेक्कन क्विन आणि लोकल अचानक एकाच ट्रॅकवर एकमेकींच्या समोर आल्या व चालकांच्या दक्षतेमुळे वेळीच नियंत्रणात येऊन थांबल्या. या रेल्वेंमध्ये 200 ते 300 मीटर अंतर राहिले होते. चालकांना नियंत्रण मिळवला आले नसते, तर होत्याचे नव्हते झाले असते.