लोकबिरादरी मित्र मंडळ ट्रस्टतर्फे रक्तदान शिबीर, अँटीबॉडी तपासणी शिबिराचे आयोजन
![Blood Donation Camp, Antibody Testing Camp Organized by Lokbiradari Mitra Mandal Trust](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/लोकबिरादरी.jpg)
पुणे | प्रतिनिधी
लोक बिरादरी मित्रमंडळ ट्रस्ट पुणेतर्फे रक्तदान शिबिर आणि कोरोना अँटिबॉडी चेकअपचे आयोजन केले आहे. ‘किट्रॉनिक्स इंडिया, करिष्मा सोसायटीजवळ, देवगिरी इंडस्ट्रियल इस्टेट, कोथरूड येथे शनिवारी (दि.९) व रविवारी (दि. १०) सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत हे शिबीर होणार आहे. रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्ट, आचार्य आनंदऋषीजी रक्तपेढी यांचे या शिबिरासाठी सहकार्य लाभले आहे, अशी माहिती लोक बिरादरी मित्रमंडळ ट्रस्टचे विश्वस्त ऐश्वर्या चपळगांवकर, सचिव नितीन पवार, शिल्पा तांबे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सध्याच्या परिस्थितीत सर्वच रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची कमतरता जाणवू लागली आहे. या परिस्थितीची जाणीव ठेऊन आपली सामाजिक बांधिलकी जपत लोकबिरादरी मित्रमंडळाने हे रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. पुण्यातील सर्व इच्छुक रक्तदाते, लोकबिरादरी मित्रमंडळ ट्रस्ट पुणेचे सभासद, कुटूंबीय आणि मित्र परिवारातील सर्व सदस्यांनी यात रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. या शिबीरात सर्वासाठी सवलतीच्या दरात ‘कोरोना अँटिबॉडी टेस्टींग’ची सुविधाही जनकल्याण रक्तपेढीतर्फे ऊपलब्ध करण्यात आली आहे. सर्व नागरिकांना त्याचा लाभ घेता येईल. शिबीरात सुरक्षित अंतर व निर्जंतुकीकरणाची योग्य ती काळजी घेतली जाणार आहे, अशी माहिती ट्रस्टने दिली.