breaking-newsताज्या घडामोडीपुणे

राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांच्या घरावर छापे

पुणे – पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांच्या घरी पोलिसांनी धाड टाकली. यावेळी त्यांच्या दोन आलिशान गाड्यांसह किंमती वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी आणखी काही जणांवर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे रिझर्व्ह बँकेने 2018-19चे ऑडीट करण्याचे आदेश दिले होते. त्यात 71 कोटी 78 लाख रुपये कमी आढळले होते. त्यानंतर या बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त करुन संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात आली. त्यावेळी आमदार अनिल भोसले यांच्यावर अपहार केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी सहकार कायद्यातील तरतुदींनुसार नुकसानीला जबाबदार असलेल्यांची संपत्ती जप्त करण्याचे अधिकार प्रशासनाला आहेत. त्यानुसार भोसलेंच्या घरावर छापे टाकत पोलिसांनी जप्तीची कारवाई केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button