breaking-newsताज्या घडामोडीपुणे

राज्य सरकारने पुणे विभागाला 15 कोटीचा आपत्ती निधी देण्याचं जाहिर

पुणे |महाईन्यूज|

महाराष्ट्रात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. राज्यात पुण्यामध्ये कोरोना विषाणूचे सर्वात जास्त रुग्ण आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून पुणे विभागाला 15 कोटींचा आपत्ती निधी देण्याचं जाहिर केल्याची माहिती पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांना पत्रकार परिषदेत दिली आहे.

पुण्यामध्ये गेल्या २४ तासांत एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. आतापर्यंत पुण्यामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 16 झाला आहे. तर गेल्या २४ तासांमध्ये २७ कोरोना संशयितांची टेस्ट निगेटिव्ह आली असल्याचे दीपक म्हैसेकर यांनी स्पष्ट केले. परदेशातून पुण्यात आलेल्या सर्व प्रवाशांची तपासणी होणार आहे. रविवारी 90 जण परदेशातून आले होते त्यापैकी 7 जणांना त्रास होत होता. त्या सर्वांची नायडू रुग्णालयात तपासणी केली जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button