राज्यात महायुतीच्या सर्वाधिक जागा जिंकतील – आदित्य ठाकरे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/shirur-lok-sabha-653x420.jpg)
पुणे – आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील अनेक भागात जाऊन महायुतीच्या उमेदवाराचा अर्ज आम्ही भरत आहोत. तसेच या निवडणुकीत आमच्या सर्वाधिक जागा जिंकतील, असा विश्वास युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. तसेच राज्यात धनुष्यबाण आणि कमळाची हवा असल्याचे त्यांनी सांगितले.
शिरुर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे शिवसेनेचे विद्यमान खासदार आणि उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. त्यापूर्वी नरपितगिरी चौकात सभा घेण्यात आली. यावेळी पुणे लोकसभा मतदार संघाचे उमेदवार पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल देसाई, शिवसेना नेत्या आमदार नीलम गोऱ्हे, आमदार बाबुराव पाचर्णे, आमदार महेश लांडगे, आमदार सुरेश गोरे तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे बैलगाडी मधून येत जोरदार शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल केला.