राज्यात पवार-ठाकरे पॅटर्न, आमच्यासाठी धोक्याची घंटा – संजय काकडे
![Former BJP MP Sanjay Kakade arrested; The case of hooliganism is going on](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/4Sanjay_Kakade_Final_20_282_29.jpg)
पुणे |महाईन्यूज|
राज्यातील आगामी निवडणुकीत पवार-ठाकरे पॅटर्न येणार आहे, त्याच्या जागा वाटपही निश्चित केलेल्या आहेत, त्यामुळे हा पॅटर्न आमच्यासाठी धोक्याची घंटा ठरेल, अशी भविष्यवाणी भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी केली आहे.
माजी खासदार संजय काकडे म्हणाले, “महाविकास आघाडीने यापुढील निवडणुका एकत्र लढवल्या, तर ती आमच्यासाठी धोक्याची घंटा असेल. आगामी काळात पवार-ठाकरे पॅटर्न अस्तित्वात येणार आहे. मागील 3 महिन्यांपासून त्यासंदर्भात हालचाली सुरु आहेत. आगामी निवडणुकासंदर्भात महाविकास आघाडीचं जागावाटपही निश्चित झालं आहे.
सरकार पाडायला हिम्मत नाही लागत, तो सगळा नंबर गेम असतो. आमचं सरकार जसं आमच्या कर्माने गेलं, तसं हे सरकार देखील त्यांच्या कर्माने जाणार आहे. आमचं सरकार होतं त्यावेळी शिवसेना खिश्यात राजीनामे घेऊन फिरायची. आता त्याचं काय झालं?” असा सवालही त्यांनी शिवसेनेला विचारला. तसेच आता आम्हाला सावध राहण्याची गरज आहे, असं मत व्यक्त केलं.