राज्याच्या पर्यटन विकासाठी भक्ती शक्ती कॉरिडॉर राबिवणार: अमोल कोल्हेंची घोषणा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/1images_335.jpg)
पुणे । प्रतिनिधी
जागतिक पर्यटन दिनानिमीत्त राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी मोठी घोषणा केली आहे महाराष्ट्र राज्याला एक मोठा इतिहास लाभला असून यासाठी आपण भक्ती-शक्ती कॉरिडॉर हा ड्रीम प्रोजेक्ट राबविणार असल्याची माहिती अमोल कोल्हे यांनी दिली आहे.
‘राज्यामध्ये अष्टविनायक तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणी छत्रपती संभाजी महाराज यांचे गडकोट अशी अनेक भक्ती व शक्तीपिठे आहेत. तीथे चांगल्या पायाभूत सुविधा दिल्यातर पर्यटनामध्ये आणखी वाढ होईल. याबरोबरच डॅम बॅक वॉटर ब्रेड ऍण्ड ब्रेकफास्ट, एक्सपिरियंन्स टुरिझम, स्टे टुरिझम अशा संकल्पना राबवत पर्यटनाला ग्लॅमर प्राप्त करुन दिले पाहिजे. यातून रोजगार निर्मीतीबरोबरच राज्यात आर्थिक सुबत्ता येईल’ , असे अमोल कोल्हे यावेळी म्हणाले .
जागतिक पर्यटन दिनानिमीत्त ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ पुणे(टॅप) संघटनेने टाफी, ईटा, ताई, स्काल आणी महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ(एमटीडीसी) यांच्यावतीने एका ऑन लाईन वेबिनारचे आयोजन केले होते. यामध्ये खासदार डॉ.अमोल कोल्हे, पर्यटन विभागाच्या उप संचालक सुप्रिया करमरकर, एमटीओएचे माजी अध्यक्ष सुधीर पाटील आदी उपस्थित होते.