मोकाट फिरणाऱ्या 300 जणांवर पुण्यात गुन्हा दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/pune-police-drone.jpg)
पुणे : महाराष्ट्रात लॉकडाऊन असतानाही अनेक जण या आदेशाला हरताळ फासताना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत तब्बल 300 मोकाट फिरणाऱ्यांवर कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्यांना चोप देऊन कारवाईचा इशारा देण्यात आला. मात्र तरीही काहींनी यावर कानाडोळा केल्याने पुणे पोलिसांनी थेट गुन्हे दाखल केले आहेत. आतापर्यंत तब्बल 300 जणांवर कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अजूनही सुरु असूनही हा आकडा वाढणार आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांनी ही माहिती दिली आहे.
यामुळे 188 कलमानुसार कारावास आणि दंडाची तरतूद केली आहे. त्यामुळे हा गुन्हा दाखल झालेल्यांना नोकरीसाठी अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच मोकाट फिरणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी पुणे पोलीस उद्यापासून ड्रोनचा वापर करणार आहे. सध्याच्या शहरातील चौकातील ठिकाणच्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यातून मोकाट फिरणाऱ्यांवर नजर ठेवली जात आहे. त्यांच्यावरही या माध्यमातून कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्त के वेंकटेशम यांनी दिला आहे.