Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊतांविरोधात पुणे न्यायालयाचे समन्स
![GOOD NEWS: Everyone will get free vaccine, Thackeray government's decision](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/Thakare-1.jpg)
पुणे|महाईन्यूज|प्रतिनिधी|
पुणे दिवाणी न्यायालायाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, खासदार संजय राऊत यांना 11 फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी काल सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान यांच्याविरोधात न्यायालयाने समन्स काढले आहेत.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ या वृत्तपत्रात भारतऐवजी हिंदुस्तान असा शब्द वापरण्यात येत आहे. सामना वृत्तपत्रामध्ये भारत ऐवजी हिंदुस्तान छापले जात असल्याने सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी याचिका दाखल केली होती. आता न्यायालयाच्या आदेशानुसार ठाकरे आणि राऊत हजर न राहिल्यास पुढील कारवाई काय होईल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.