breaking-newsपुणेमुंबई
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरचा रोड ब्लॉक रद्द
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर मंगळवारी ओव्हर हेड गँन्ट्री बसवण्याचे काम रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे एक्सप्रेस वे वर वाहतूक सुरु राहणार आहे. पुणे लेनवर ओव्हर हेड गँन्ट्री बसवण्याच्या कामासाठी दुपारी १२ ते दोन अशी दोन तासासाठी वाहतूक बंद ठेवण्यात येणार होती.
पण अतिवृष्टीमुळे हे काम रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वे दोन तासासाठी बंद राहणार नाही. दररोज या मार्गावरुन लाखो वाहनांचा प्रवास सुरु असतो.