breaking-newsताज्या घडामोडीपुणे

‘माझ्या वक्तव्याने कोणी दुखावले असेल तर त्यांची माफी मागतो’

पुणे |महाईन्यूज|प्रतिनिधी|

कीर्तनाच्या माध्यमातून मी कोणत्याही वर्गावर जाणीवपूर्वक किंवा ठराविक उद्देश ठेवून एखादे विधान करत नाही. तरीही अनावधानाने माझ्या तोंडून निघालेल्या विधानाने कोणी दुखावले असेल तर मी त्यांची माफी मागतो, असे प्रसिध्द कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी म्हटले आहे. कीर्तनातील वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत सापडलेल्या इंदोरीकर महाराजांनी आपल्या एका कार्यक्रमातून दुखावलेल्या प्रत्येकाची जाहीर माफी मागितली आहे. 

मुला-मुलींच्या जन्मावरुन वादग्रस्त वक्तव्यामुळे इंदोरीकर महाराज वादात सापडले होते. त्यानंतर इंदोरीकर महाराजांवर चर्मकार समाजाचा अवमान केल्याचा आरोप झाला. यासंदर्भात चर्मकार समाज आणि बहुजन आघाडीने मुंबईतील वर्तकनगर पोलिसात त्यांच्याविरोधात अ‍ॅट्रॉसिटीची गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती.

इंदोरीकर महाराज हे आपल्या कीर्तनामध्ये अनेकदा महिलांच्या विरोधात वक्तव्य करत असतात. यापूर्वीही अनेकदा त्यांच्यावर यासंदर्भात टीकाही झाली आहे. त्या तमाम महिलांची आणि मुलींचा उल्लेख करत त्यांनी माफी मागितली आहे. कोणाला दुखवण्यासाठी मी कीर्तन करत नाही, असेही ते यावेळी म्हणाले

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button