Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
माजी खासदार संजय काकडे आणि पत्नी उषा काकडे यांना जामीन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/3Former_20BJP_20MP_20Sanjay_20Kakade_20goes_20missing_20along_20with_20his_20wife.jpg)
पुणे – मेव्हण्याला जीवे मारण्याच्या धमकीप्रकरणी पुण्यातील भाजपचे सहयोगी माजी खासदार संजय काकडे यांना अटक करण्यात आली होती, पुणे जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्यांना जामीन देण्यात आला आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी उषा काकडे यांनाही न्यायालयाने जामीन दिला आहे.
संजय काकडे यांनी युवराज ढमाले यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे ढमाले यांनी चतुःश्रुंगी पोलिसांकडे संजय काकडे आणि त्यांच्या पत्नी उषा काकडे यांच्याविरोधात फिर्याद दिली होती. आज जिल्हा न्यायालयात दोघांविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. संजय काकडे जिल्हा न्यायालयात हजर झाले होते. न्यायालयाने दोघांना 10 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला आहे.