breaking-newsताज्या घडामोडीपुणे
महाराष्ट्र पोलीस दलातील 331 कर्मचारी गेल्या 24 तासात कोरोना पॉझिटीव्ह
पुणे: महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेल्या 331 पोलीस कर्मचाऱ्यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आलेली आहे. तर 5 कर्मचाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. राज्य पोलीसदलातील कोरना व्हायरस संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 19,385 इतकी झालेली आहे. त्यातील 3,670 कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 15,521 जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. तर 194 जणांचा मृत्यू झालेला आहे. राज्य पोलीस दलाने ही माहिती दिलेली आहे.