भोर तालुक्यातील कुसगाव मध्ये काँग्रेसच्या बाले किल्याला खिंडार
![In Kusgaon in Bhor taluka, a hole was made in the fort of Congress](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/bhor-grampanchayt.jpg)
- ४० वर्षांनी सत्तांतर; शिवसेना विजयी
पुणे | प्रतिनिधी
पुणे शहरा पासून अवघ्या 15 कि.मी अंतरावर असणाऱ्या भोर तालुक्यातील कुसगाव येथे 40 वर्षांनी सत्तांतर झाली. या गावचा कोणत्याही प्रकारचा विकास झाला नसल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्यामुळे शिवसेनेच्या काळभैरवनाथ गाव विकास पॅनलच्या हाती सत्ता दिलेला आहे. विशेष म्हणजे श्री काळभैरवनाथ गाव विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांनी आता गावात येणारा मुख्य रस्ता, गावातील अंतर्गत रस्ते, पाणी पुरवठा, ड्रेनेजलाईन, आरोग्य व शैक्षणिक, गोष्टीवर लक्ष्य केंद्रीत करून सर्व विकास कामे प्रगती पथावर करण्याचे ठरविले आहे.
काळभैरवनाथ गाव विकास पॅनलच्या विजयासाठी कुलदीप कोंडे (पुणे जिल्हा सह – संपर्क प्रमुख ) यांच्या मार्गदर्शनाखाली ऍड. निखिल संजय कोंडे, संतोष शिंदे, दिलीप तांबट, हनुमंत गेनबा मांढरे, (मा.उपसरपंच), संभाजी कोंडे, शंकर दत्तात्रय मांढरे, शोभाबाई शंकर मांढरे, समिंदराबाई शंकर मांढरे, संतोष कोंडे, नंदकुमार रामचंद्र भालघरे, विघ्नहर्ता तरुण मंडळ, काळभैरवनाथ तरुण मंडळ, राजमुद्रा मित्र मंडळ, जय गणेश मित्र मंडळ, श्रीनाथ मित्र मंडळ, छावा ग्रुप, शिवशंभो मित्र मंडळ यांचे सहकार्य लाभले.