भूमिअभिलेखचे उपसंचालक बाळासाहेब वानखेडेची पोलिसांसमोर शरणागती
पुणे – वकिलामार्फत 1 कोटी 70 लाखांची लाच स्वीकारल्याच्या प्रकरणात आरोपी असलेले भूमिअभिलेखच उपसंचालक बाळासाहेब वानखेडे अखेर पोलिसांत हजर झाले आहेत.
उच्च न्यायालयाने जानेवारीत त्यांचा जमीन फेटाळला होता. तेव्हापासून ते फरार होते. याबाबत अॅड. रोहित शेंडे (वय 27) याला 26 डिसेंबर 2018 रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली होती. वानखेडेंच्या सांगण्यावरूनच लाच स्वीकारल्याचे अॅड. शेंडे याच्याकडे करण्यात आलेल्या तपासात निष्पन्न झाले होते. त्यानंतर 4 जानेवारी रोजी वानखेडे देखील या गुन्ह्यात आरोपी असल्याचे स्पष्ट झाले होते. वानखेडे आणि अॅड. शेंडे यांच्यात 600 हून अधिक फोन झाले आहेत. त्यावरून ते एकमेकांच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट होत आहे. तर अॅड. शेंडे आणि तक्रारदार यांच्यात सुमारे 150 कॉल झाले असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.
वानखडे यांना सोमवारी दुपारी न्यायालायत हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांची 28 मार्चपर्यत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.