भाजपाची अवस्था पाण्याबाहेरील तडफडणाऱ्या माशासारखी – बाळासाहेब थोरात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/download-5.jpg)
पुणे|महाईन्यूज|प्रतिनिधी|
राज्यातील सत्ता गेल्यामुळे भाजपाची अवस्था पाण्याबाहेरील तडफडणाऱ्या माशासारखी झाली असल्याचे मत राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज पुण्यात व्यक्त केली.
शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शनिवारी राजीनामा दिला आहे. या राजीनाम्याबाबत प्रतिक्रिया देताना, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी ‘लग्नाची तयारी झाली आहे, नवरदेवही नटूनथटून बसलाय, पण लग्नाची वरात निघण्यापूर्वीच घोडा पळून गेल्याचे म्हटले होते.” थोरात यांनी बापट यांच्या टिकेला उत्तर देताना हे मत व्यक्त केले आहे.
थोरात पुढे म्हणाले, राज्यातील राजकारण वेगळ्या वळणावर आहे. त्यामुळे काहीजण नाराज होणार हे समजून घेतले पाहिजे. तीन पक्षांचे सरकार असल्याने प्रत्येकाची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबाबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आम्हा सर्वांना मार्गदर्शन करत आहेत.