बी.के.एस अय्यंगार यांची मुलगी डॉ. गीता अय्यंगार यांचे निधन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/Dr-Geeta.jpg)
योगाचार्य बी. के. एस अय्यंगार यांच्या ज्येष्ठ कन्या आणि रमामणी अय्यंगार मेमोरियल योग इन्सिट्युट या संस्थेच्या संचालिका योगगुरू डॉ. गीता अय्यंगार यांचे रविवारी (१६ डिसेंबर)रोजी निधन झाले. त्या ७४ वर्षांच्या होत्या. ह्रदयाच्या स्नायुंमध्ये रक्ताच्या गाठी झाल्याने त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे त्यांचे बंधु प्रशांत अय्यंगार आणि चार बहिणी असा परिवार आहे. वयाच्या अकराच्या वर्षी त्यांनी वडिलांच्या मार्गदर्शनाने योगसाधनेला सुरुवात केली. आयुर्वेद आणि योग यांवर त्यांचा गाढा अभ्यास होता.
रमनानी अय्यंगार मेमोरियल योगा इन्स्टिट्युट( पुणे) च्या त्या संचालक होत्या. या संस्थेची स्थापना १९ जानेवारी १९७५ रोजी त्यांच्या वडिलांनी पुण्यात केली. या संस्थेत योगसाधनेचे धडे दिले जातात. येथे योगविद्या संशोधन केंद्रदेखील आहे, गीता अय्यंगार याठिकाणची बरीच जबाबदारी सांभाळायच्या. योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या योग शिबिरात कालपर्यंत त्या ५६ देशामधून आलेल्या योग साधकांना प्रशिक्षण देत होत्या. त्यांच्या अशा अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. दुपारी तीन वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील असे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले.