breaking-newsताज्या घडामोडीपुणे

बारामतीत महिला सरपंचाच्या पतीचा खून; गावात तणाव

बारामती – तालुक्यातील सोनगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच जयश्री थोरात यांचे पती युवराज आबासाहेब थोरात (वय ५०) यांचा तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करत खून करण्यात आला आहे. बुधवारी (दि. १५) रोजी दुपारी दोनच्या सुमारास सोनगावातील सोनेश्वर मंदिरालगत ही घटना घडली. पारधी समाजाच्या एका युवकाने त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती आहे.

सोनेश्वर मंदिरात गावासह पंचक्रोशीतील महिला संक्रातीनिमित्त ओवाळण्यासाठी जमा झाल्या होत्या. यावेळी तेथे संबंधित तरुण महिलांची छेडछाड करत होता. सरपंच जयश्री थोरात यांचे पती युवराज यांनी त्याला याचा जाब विचारला. त्यावरू चिडून जावून त्याने त्यांच्यावर सपासप वार केले. त्यात थोरात हे जागीच ठार झाले आहेत.

दरम्यान या घटनेनंतर गावातील वातावरण तणावपूर्ण झाले असून संतप्त जमावाने गावातील पारधी समाजाची घरे पेटवली आहेत. तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याचे काम सुरु आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button