बाप-लेकीच्या नात्याला काळीमा! बापाकडून सलग चार वर्षे दोन मुलींवर बलात्कार
![Shocking! Death of a poisoned victim after torture](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/rape.jpg)
पुणे – पुण्यातील कोंढवा परिसरात एका नराधम पित्याने पोटच्या मुलींवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी वडील अल्पवयीन मुलींवर गेल्या चार वर्षांपासून लैंगिक अत्याचार करत होता. पीडित मुलींच्या आईने फिर्याद दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “कोंढवा परिसरात आरोपी पत्नी आणि चार मुलींसह वास्तव्यास आहे. त्याचा फर्निचरचा व्यवसाय आहे. आरोपी दोन्ही नऊ वर्षांच्या मुलीवर २०१६ पासून लैंगिक अत्याचार करत होता. या प्रकाराची माहिती पत्नीला मिळाली. त्यावर आरोपी पतीने पत्नीला कोणाला सांगितलं तर मुलींना ठार मारुन टाकेन अशी धमकी दिली. या भीतीपोटी पत्नी कोणाला सांगत नव्हती. पण त्याचवेळी हा संपूर्ण प्रकार एका वकिलाला समजला. त्यानंतर त्याने पीडित मुलीच्या आईला धीर देत तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आणलं. यावेळी तिने सगळा प्रकार सांगितला”.
“आम्ही गुन्हा दाखल करून तात्काळ आरोपी पित्याला अटक केली आणि न्यायालयासमोर हजर केले. याप्रकरणी १५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायालयाने दिले आहेत,” अशी माहिती कोंढवा पोलिसांनी दिली.