प्रियकराकडून विवाहित प्रेयसीवर अॅसिडसदृश केमिकल हल्ला
![Jugar khelenā चारya four jānāna vakad polisankadun stuck; Three hundred and ninety-five evicted](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/Crime.jpg)
पुणे |महाईन्यूज|
पुण्यातील पर्वती दर्शन येथील भांबरे शाळेशेजारी एका प्रियकराने प्रेयसीवर अॅसिडसदृश केमिकलने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेत महिलेचा चेहरा खूप भाजला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. अय्याज तांबोळी या आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अय्याज तांबोळी आणि पीडित तरुणी हे चांगले मित्र होते. त्या दोघांचे रूपांतर प्रेमात झाले. पण त्याच दरम्यान पीडित तरुणीचे लग्न झाले. त्यानंतर ती पर्वती येथील घरी आल्यावर आरोपीने तिला भेटण्यास बोलवले.
आता तू माझ्या मागे लागू नकोस, माझे लग्न झालेले आहे. असे त्या तरुणीने आरोपीला सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. ‘तुझे अपने आपपर गुरुर है ना, देख मै तेरा गुरुर तोड देता हूँ’ असे आरोपीने म्हणत तरुणीवर ॲसिडसदृश केमिकल फेकले आहे. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आल्याचे दत्तवाडी पोलिसांनी सांगितले.