breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यासह पिंपरी-चिंचवड परिसरात ‘आधार’ची ३९६ केंद्रे पुन्हा कार्यान्वित

पुणे |महाईन्यूज|

पुणे जिल्ह्यातील ठप्प झालेली आधार केंद्रे पुन्हा कार्यान्वित होणार आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यात आधार केंद्रे सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने जाहीर केला आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि परिसरात सरकारी कार्यालयांत मिळून १५०, बँकांमध्ये १०० आणि टपाल कार्यालयांमध्ये १३६ अशी शहरासह जिल्ह्यात ३९६ आधार केंद्रे सुरू करण्यात आली आहेत, असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मिळून शहरी भागात २८० आणि ग्रामीण भागात ११६ अशी ३९६ आधार केंद्रे आहेत.

खासगी जागेसह ‘आपले सरकार’ सेवा केंद्रे येथे सुरू असलेली सर्व आधार केंद्रे सरकारी जागेत स्थलांतरित केली आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांची क्षेत्रीय कार्यालये, कँटोन्मेंट बोर्ड, पुणे महापालिकेचे कर संकलन केंद्र, जिल्ह्यातील तहसील कार्यालये, नगरपालिका, पंचायत समिती अशा विविध सरकारी कार्यालयांमध्ये आधार केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

दरम्यान, प्रत्येक सरकारी कामे, रुग्णालये, विमान प्रवास अशा विविध कारणांसाठी आधार क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे. त्यामुळे आधार नोंदणीपेक्षा आधार कार्डवरील वय, पत्ता, मोबाइल क्रमांक, जन्मतारीख, छायाचित्र अशा विविध दुरुस्त्यांसाठी नागरिकांची आधार केंद्रांवर गर्दी होत असते. 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button