breaking-newsपुणे

पुण्यामध्ये महिनाभरात कोरोना रुग्णांचा उच्चांकी आकडा, पुन्हा लॉकडाऊनची मागणी

पुणे |महाईन्यूज | प्रतिनिधी

पुण्यात लॉकडाउन  हटविल्यानंतर महिन्याभरात Covid-19 रूग्णांची संख्या तिप्पट वाढलीय तसंच मृत्यूसंख्येतही दुप्पट वाढ झाली आहे. Active रूग्णसंख्याही 3 हजारांवरून थेट 6 हजारांच्यावर गेली आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाचे स्थानिक नेतेही पुन्हा टोटल लॉकडाऊनची मागणी करू लागले आहेत. सजग नागरिक मंचाने मात्र लॉकडाऊनला कडाडून विरोध दर्शवला आहे. त्यावरून राजकारणालाही (Politics on Covid-19 ) आता सुरूवात झाली आहे.

रुग्णसंख्या वाढल्याने पुण्यात पुन्हा टोटल लॉकडाऊन करण्यावरून राजकारणाला सुरुवात झाली आहे. लॉकडाऊन उठताच पुण्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. लोक सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत नसल्यामुळे आजपर्यंत काही भागापूरताच मर्यादित असलेला कोरोनाचा संसर्ग आता कोथरूड, कोरेगाव पार्कसारख्या उच्चभू भागातही आपले हातपाय पसरू लागला आहे. त्यामुळे भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी शहरात पूर्णपणे लॉकडाऊन करा, अशी मागणी केली आहे.

भाजपच्या या मागणीला राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे आणि काँग्रेस गटनेते आबा बागुल यांनी पाठिंबा दिला आहे. सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी मात्र, पुन्हा लॉकडाऊन करण्यास कडाडून विरोध दर्शवला आहे. लॉकडाऊन हा उपाय होऊ शकत नाही. लोकांनी आणि सरकारने मिळून उपाययोजना केल्या पाहिजेत असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button