breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात ABVP च्या कार्यालयाला फासलं काळ, राष्ट्रवादीचे आंदोलन

पुणे|महाईन्यूज|प्रतिनिधी|

दिल्लीत जेएनयुमध्ये झालेल्या हल्ल्याचे पडसाद आजही पुण्यात उमटले. सदाशिव पेठेतील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यलयाच्या नामफलकाला काळे फासल्याचा प्रकार आज घडला. जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले.

दिल्लीतील जेएनयुमधील विद्यार्थी व प्राध्यापकांना झालेल्या मारहाणीचे संपूर्ण राज्यसह पुण्यात पडसाद उमटले होते. नाशिक येथे अभाविप व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ऐकमेकांशी भिडले तर, आज अभाविपच्या सदाशिव पेठेतील पेरुगेटजवळ असणाऱ्या सुविधा अपार्टमेंटमधील कार्यालयाच्या फलकाला काळे फासण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त वाढविला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button