पुण्यात 15 वर्षीय मुलीचा बालविवाह, पोलिसात गुन्हा दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/8.jpg)
पुणे |महाईन्यूज|
पुणे जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला. पंधरा वर्षीय मुलीचा बालविवाह करण्यात आला. या प्रकरणी मुलासह मुलीच्या नातेवाईकांविरोधात लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्न म्हटलं की दोन कुटुंबांना एकत्र आणुन सुखी संसाराची स्वप्न नवरा मुलगी पहात असतात. मात्र याच लग्नांची कायद्याची बंधणे घातली आहे. या कायद्यांना पायदळी तुडवत पंधरा वर्षीय मुलीला विवाह बंधनात अडकवल्याने दोन्ही कुटुंबातील सदस्य विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
तर बाबतीत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नदिंनी जाधव यांनी सांगितले की आम्हाला एक निनावी फोन आला. त्यानुसार आळंदी येथे एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार आम्ही आळंदी मध्ये धाव घेत. आळंदी परिसरातील पाहणी करुन माहिती घेतली असता तोच विवाह हवेली तालुक्यातील बुर्केगाव येथे मुलाच्या घरी होणार असल्याची माहिती मिळली. त्यानुसार बुर्केगाव येथे जाऊन माहिती घेतली व मुलीची सुटका केली. याप्रकरणी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे
बुर्केगाव येथे एका 15 वर्षीय मुलीचा विवाह लावण्यात आले आल्याची माहिती मिळतात लोणीकंद पोलिसांनी तात्काळ तिथे धाव घेत अल्पवयीन मुलीची सुटका करत मुलीला माहेर या संस्थेत रवाना करण्यात आले. मुलाच्या व मुला-मुलींच्या नातेवाईक विरोध विरोधात बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास सुरू आहे.