पुण्यात स्वस्त घरासाठी कुटुंबावर जीवघेणा हल्ला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/attacked.jpg)
पुणे – कमी किंमतीत घर विकण्यास नकार दिल्यानं पिंपरी-चिंचवडमधील माथाडी संघटनेच्या अध्यक्षानं वाकड येथील सुर्वे कुटुंबावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी हल्लेखोरासह त्याची आई, बहीण आणि साथीदारावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दहा महिन्यांपूर्वी श्रीकांत सुर्वे यांनी वाकड येथे घर खरेदी केले आहे. पिंपरी-चिंचवडमधील माथाडी संघटनेचा अध्यक्ष बबलू जोगदंड याला ते घर आणि जागा कमी किंमतीत खरेदी करायची होती. पण त्याआधीच सुर्वे यांनी ती जागा आणि घर खरेदी केले. त्यानंतर जोगदंड आणि सुर्वे यांच्यात वाद सुरू होता. या वादातूनच जोगदंड यानं सुर्वे कुटुंबावर जीवघेणा हल्ला केला. श्रीकांत सुर्वे यांच्यावर कोयत्यानं वार केले आहेत. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची पत्नी आणि दहा वर्षांची मुलगी या हल्ल्यातून बचावली आहे. गंभीर जखमी झालेल्या सुर्वेंना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी जोगदंड याच्यासह त्याची आई, बहीण आणि एका साथीदारावर वाकड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.