breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात विद्यार्थीनीच्या लैंगिक शोषणाचा आरोप; प्राध्यापकाला पालकांकडून मारहाण

पुणे – पुण्यात प्राध्यापकाला पालकांकडून मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. प्राध्यापकाने विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. पालक या विरोधात सिंहगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी जमले असून वातावरण तापले आहे.

सिंहगड रस्ता परिसरातील शिक्षा अकॅडमीत नववी ते आयटीआय पर्यंतचे वर्ग चालवले जातात. येथे येणाऱ्या विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्यासंदर्भात जाब विचारायला गेलेल्या पालकांना तसेच उपस्थित शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून मारहाण झाल्याचा आरोप सेनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे परिसरात वातावरण तापले असून दोषी क्लास चालक आणि पोलिस कर्मचारी यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.


यावेळी सर्वपक्षीय नेते आनंदनगर येथील सिंहगड पोलिस ठाणे येथे उपस्थित होते. यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, निलेश गिरमे, महेश पोकळे, शिवा पासलकर, दत्ता रायकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्षा स्वाती पोकळे माजी नगरसेवक विकास दांगट आणि इतर राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button