breaking-newsपुणे
पुण्यात लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी 236 वाहनं जप्त
पुणे : पुण्यात 23 तारखेपर्यंत दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, पहिल्याच दिवशी काही पुणेकरांनी या लॉकडाऊनला हरताळ फासला आहे. लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी तब्बल 593 नागरिकांनी लॉकडाऊनचं उल्लंघन केलं .
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शहरात ठिक ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरात दिवसा 103 ठिकाणी आणि रात्री 55 ठिकाणी नाकाबंदी सुरु आहे. या नाकाबंदीत कलम 188 अंतर्गत 253 नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. तर नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांची 236 वाहनं जप्त करण्यात आली. 144 अंतर्गत 73 नागरिकांना नोटीस बजावली.