breaking-newsताज्या घडामोडीपुणे
पुण्यात महिलेला गुंगीचे औधष देवून पोलिस निरीक्षकाने केला बलात्कार
![Rape by showing the lure of marriage, trustee of Mahim Dargah Dr. Allegations against Mudassir Nisar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/728812-rape-crime.jpg)
पुणे |महाईन्यूज|
पोलिस वसाहतीत एका महिलेला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन पोलिस निरीक्षकाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक चंद्रकांत भगवानराव माने यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पीडीत महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिस निरीक्षक माने यांची सोलापूर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात नेमणूक करण्यात आली आहे. माने हे पुण्यात नेमणुकीस होते. त्यावेळी त्यांची पीडित महिलेबरोबर ओळख झाली होती. शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन माने यांनी बलात्कार केल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे.